संगीत आणि क्रीडा
Posted on January 18, 2025
श्रीमती. योगिनी कानडे
शिक्षिका, डी.ई.एस प्रायमरी स्कूलसंगीत व क्रीडा या दोन विषयांचे एकमेकांशी असणारे नाते पार वेगळेच आहे. क्रीडा म्हणजे मैदानावर केले जाणारे व्यायामप्रकार एवढेच नाही. क्रीडा या क्षेत्रात विविध व्यायाम प्रकार, विविध खेळ, शरीर सुदृढतेसाठी केले जाणार उपक म मनोरंजनात्मक खेळ इ. गोष्टी समाविष्ट केल्या गेल्या आहेत. अगदी पूर्वीपासून चाललेल्या आपल्या पारंपरिक खेळांना देखील संगीताची साथ मिळालेली आहे. उदाहरण द्यायचे झाले तर बघा नागपंचमीचे खेळ, मंगळागौरीचे खेळ खेळताना मुली गाणी म्हणत खेळतात.
फुगडी चहा बाई चहा गवती चहा, आम्हा मैत्रिणींची फुगडी पाहा.
झिम्मा झिम पोरी झिम, कपाळाला बीम...
गोफ गोफ विणू बाई, गोफ विणू...
नकुल्या - नकुल्या बाई नकुल्या चंदनाच्या टिकुल्या...
आगोटा - पागोटा...
खुर्ची का मिर्ची जाशील कैसी... फर
आणि असे बरेच काही. ..
विशेष म्हणजे जात्यावर दळण दळणे, खाली वाकून सडा, रांगोळी घालणे, पूर्वीच्या काळी दोन पायांवर बसून घर सारवणे आणि त्या वेळेस स्त्रिया विविध प्रकारच्या ओव्या म्हणत असतं. आला की नाही संगीत आणि खेळाचा, व्यायामाचा संबंध.मुलांच्या बाबतीत म्हणालात तर झांज, लेझीम, डोल ताशा, पुगुरूकाठी इ. साहित्य घेऊन मुले विविध प्रकारच्या सांगितिक कवायती करत असत. हे झालं पूर्वीचं आणि आता तर हे दोन्ही विषय हातात हात घालून बावरताना दिसतात. बधा ना ध्वजारोहण करताना अथवा ध्वजावतरणाच्या वेळेस आपण बिगूल हे वाद्य वाजवतो.ध्वजाला सलामी देताना, त्याचप्रमाणे मान्यवरांना सलामी देताना आपण जे संचलन करतो, त्या वेळेसदेखील आपण वाद्यांची साथ घेत असतो. या ठिकाणी देखील आपल्याला संगीत व क्रीडा क्षेत्राचा संबंध जाणवतो, सांघिक कवायत करताना आपण सांगीतिक कवायत याचा आवर्जुन विचार करतो. आजच्या या युगात रिदमिक एक्सरसाईज म्हणजेच अॅरोबीक्स, झुंबा हे फॉर्म्स, आपण म्युझिकवरच करतो.
सध्या प्रचलित असलेलं म्युझिकल चिकन डान्स अतिशय सुप्रसिद्ध आणि सगळ्यांना आवडणारं आहे. सध्याच्या काळात शारीरिक आरोग्यावर सगळ्यांमध्ये जागरूकता आढळून येत आहे. आपल्या आजूबाजूला तळजाईवर, सिहगडावर विविध ग्राउंडवर आपल्याला सर्व नागरिक चालणे, पळणे, सायकलिंग करताना कानामध्ये हेडफोन घालून वावरताना दिसतात.
संगीताची साथ करून क्रीडा करणे महणजे खूप आनंद मज्जा, मस्ती होय. अशीच जागरूकता आपल्या आरोग्याविषयी राहावी आणि या क्षेत्रात काम करणान्या सर्वांना संगीताची छान साथ लाभावी.